सुषमा स्वराज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख : राष्ट्रपती

वृत्तसंस्था
Wednesday, 7 August 2019

सुषमा स्वराज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. देशाने आपली प्रिय मुलगी गमावली. त्यांनी सार्वजनिक जीवनात अत्यंत निष्ठापूर्वक काम केले.

- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करून दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, सुषमा स्वराज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. देशाने आपली प्रिय मुलगी गमावली. 

राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विट करून सांगितले, की सुषमा स्वराज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. देशाने आपली मुलगी गमावली. त्यांनी सार्वजनिक जीवनात अत्यंत निष्ठापूर्वक काम केले.

लोकांना सहाय्य करण्यासाठी त्या नेहमी तत्पर असायच्या. त्यांनी देशासाठी केलेल्या कार्यामुळे त्या नेहमी स्मरणात राहतील, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushma Swaraj died very sad says President Ramnath Kovind