सुषमा स्वराज यांच्या निधनाने धक्का बसला : राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

सुषमा स्वराज देशातील अशा नेत्या होत्या ज्यांचा मित्रपरिवार सगळ्या पक्षात होता. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते.

नवी दिल्ली : माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्काच बसला. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

सुषमा स्वराज यांचा मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राहुल गांधी यांनीही सुषमा स्वराज यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

राहुल गांधी म्हणाले, की सुषमा स्वराज देशातील अशा नेत्या होत्या ज्यांचा मित्रपरिवार सगळ्या पक्षात होता. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते. सुषमा स्वराज यांच्या निधनाचे मी दु;ख व्यक्त करतो आणि स्वराज यांच्या कुटुंबीयांना दु:खातून सावरण्यासाठी प्रार्थना करतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushma Swaraj an extraordinary political leader says Rahul Gandhis tribute