57 मुस्लिम देशांच्या प्रतिनिधींसमोर पाकला खडसावणारी वाघीण

वृत्तसंस्था
Wednesday, 7 August 2019

पाकिस्तानचं नाव न घेता सुषमा स्वराज यांनी पाकवर हल्ला चढवला होता. दहशतवाद अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. आमची लढाई कोणत्याही धर्माविरोधात नाही, तर आमची लढाई दहशतवादाविरोधात आहे.

पुणे : जगभरातील 57 मुस्लिम देशांच्या अबूधाबी येथील ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशनमध्ये (OIC)  निवेदन दिले होते. त्यावेळी स्वराज यांनी दहशतवादाचा उल्लेख करत, दहशतवाद पोसणाऱ्या देशांना चांगलंच फटकारले होते. त्यामुळे स्वराज यांचे भरभरून कौतुक झाले होते.

यावेळी स्वराज म्हणाल्या, "भारत हा महात्मा गांधींचा देश आहे, भरता प्रत्येक धर्माचा आदर राखला जातो, भारतात प्रत्येक प्रार्थना ही शांतीनेच संपते, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता पाकिस्तानलाही खडसावलं होतं. त्यामुळे ती स्वराज यांची परिषद चानागलीच गाजली होती.

पाकिस्तानचं नाव न घेता सुषमा स्वराज यांनी पाकवर हल्ला चढवला होता. दहशतवाद अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. आमची लढाई कोणत्याही धर्माविरोधात नाही, तर आमची लढाई दहशतवादाविरोधात आहे. दहशतवादाने आज प्रत्येक देश त्रस्त आहे. मात्र भारताने दहशतवादाचं भयानक रुप पाहिलं आहे”, असं सुषमा स्वराज यांनी सांगितले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushma Swaraj many times attack on Pakistan