मेहुल चोक्सीला लवकरच भारतात आणणार

मेहुल चोक्सीला लवकरच भारतात आणणार

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) कोट्यवधींचा गैरव्यवहार करून परदेशात पळून गेलेला हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अँटिग्वाचे परराष्ट्रमंत्री ई. पी. चेट ग्रीन यांची भेट घेतली.

संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण बैठकीत सहभागी होण्यासाठी सुषमा स्वराज अमेरिकेत गेल्या आहेत. या बैठकीदरम्यान सुषमा स्वराज यांनी चेट यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सुषमा स्वराज यांनी अँटिग्वा सरकारला 'पीएनबी' गैरव्यवहारातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर चेट यांनी स्वराज यांना आश्वासन देत आम्ही याप्रकरणात भारताला सर्वतोपरी मदत करु, असे सांगितले. 

मेहुल चोक्सीला अँटिग्वाचे नागरिकत्व मिळाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून हालचालींना वेग आला आहे. भारताकडून अँटिग्वा सरकारला यासाठी आवाहन करण्यात आले आहे. या चर्चेबाबत चेट यांना विचारले असता ''भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना विचारा'' असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयानुसार मेहुल चोक्सीने देशात मोठा गैरव्यवहार केला. त्यानंतर त्याने देशातून पळ काढला आहे. त्याच्या प्रत्यार्पणाबाबत अँटिग्वाकडून मोठी आशा आहे. त्यामुळे यावर चेट यांनीही एक सरकार म्हणून आम्ही भारताला पूर्णपणे सहकार्य करू, असे आश्वासन दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com