आता लोकसभा लढविणार नाही; स्वराज यांचे स्पष्टीकरण

Sushma Swaraj not to Contetst next Loksabha Elections
Sushma Swaraj not to Contetst next Loksabha Elections

नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला. तसेच त्यांनी याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अमित शहा यांना पूर्वकल्पनाही दिल्याची माहिती मिळत आहे.

इंदूर येथे माध्यमांशी बोलताना स्वराज यांनी ही माहिती दिली. मध्य प्रदेश राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेसाठी स्वराज या राज्य दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, की ''मी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नाही. माझ्या या निर्णयाची पूर्वकल्पना पक्षाध्यक्ष अमित शहा यांना दिली आहे''. मात्र, याबाबतचे कारण त्यांनी सांगितले नाही.

मागील काही महिन्यांपासून स्वराज यांची प्रकृती ठीक नाही. यापूर्वी त्यांना अनेकदा रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. त्यामुळे स्वराज लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता स्वत: स्वराज यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर या सर्व शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे. 

दरम्यान, स्वराज या मध्य प्रदेशातील विदिशा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता त्यांना भाजपकडून राज्यसभेवर पाठविले जाण्याची दाट शक्यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com