भारत-पाक क्रिकेट मालिका त्रयस्थ ठिकाणीही नाही: स्वराज

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जानेवारी 2018

दोन्ही देशांतील सध्याचे संबंध पाहता यांच्यात क्रिकेट मालिका त्रयस्थ ठिकाणी होणेही शक्य नाही. पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून, दहशतवादी कारवायाही सुरु आहेत. त्यामुळे या वातावरणात दोन्ही देशांतील क्रिकेट मालिका शक्य नाही. 

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील क्रिकेट मालिका त्रयस्थ ठिकाणीही होणार नसल्याचे आज (सोमवार) परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये आज झालेल्या बैठकीत भारत-पाक मालिकेची शक्यता धुडकावून लावण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकेबाबत आशा मावळली आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (पीसीबी) सतत क्रिकेट मालिकेबाबत बीसीसीआयकडे विचारणा करण्यात येत आहे. बीसीसीआयने सरकारच्या निर्णयावर मालिका अवलंबून असल्याचे म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात डिसेंबर 2012 मध्ये एकदिवसीय व ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका झाली होती.

सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे, की दोन्ही देशांतील सध्याचे संबंध पाहता यांच्यात क्रिकेट मालिका त्रयस्थ ठिकाणी होणेही शक्य नाही. पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून, दहशतवादी कारवायाही सुरु आहेत. त्यामुळे या वातावरणात दोन्ही देशांतील क्रिकेट मालिका शक्य नाही. 

Web Title: Sushma Swaraj says no to India Pakistan bilateral series at neutral venue