सुषमा स्वराज यांनी सोडले सरकारी निवासस्थान

वृत्तसंस्था
शनिवार, 29 जून 2019

नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर महिन्याभराच्या आत सुषमा स्वराज यांनी सरकार निवासस्थान रिकामे केले आहे.

नवी दिल्ली : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिल्लीतील आपले सरकारी निवासस्थान सोडले आहे. याबाबतची माहिती त्यांनी आज (शनिवार) सकाळी टि्वटरवरुन दिली. यानंतर सोशल मीडियातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

स्वराज यांनी ट्विटरमध्ये म्हटले आहे की, 'नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर महिन्याभराच्या आत सुषमा स्वराज यांनी सरकार निवासस्थान रिकामे केले आहे. ८, सफदरजंग लेन मार्गावरील मी माझे सरकारी निवासस्थान सोडले आहे. आता मी आधीचा पत्ता आणि फोन नंबरवर उपलब्ध नसेन.'

केंद्रात सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्या सहभागी झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत सुषमा यांनी पक्षाच्या आग्रहानंतर ही निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्या जागी जयशंकर प्रसाद यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. सुषमा स्वराज यांनी आपले शासकिय निवासस्थानसुद्धा सोडले आहे. सुषमा स्वराज यांनी ट्वीट करत हा निर्णय जाहीर केला आहे. परराष्ट्र मंत्री म्हणून बजावलेल्या सेवेबद्दल टि्वटरवर अनेकांनी सुषमा स्वराज यांचे कौतुक केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushma Swaraj vacates official residence