गुजरात स्फोटातील फरारीला बेळगावात अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 20 जून 2016

बेळगाव- गुजरातमध्ये आठ वर्षांपूर्वी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील फरारी संशयिताला बेळगावात अटक करण्यात आली. अहमदाबाद येथील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रविवारी (ता. 19) रात्री ही कारवाई केली. नासीर ऊर्फ परवेज अब्दुलमजीद रंगरेज (38, पूर्वी रा. भडकल गल्ली, सध्या आझाद गल्ली) असे संशयिताचे नाव आहे. मार्केट पोलिसांच्या सहायाने त्याला खडेबाजारमध्ये ताब्यात घेऊन पथक अहमदाबादला रवाना झाले. 

26 जुलै 2008 रोजी अहमदाबाद येथे दहशतवाद्यांनी 21 साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. यामध्ये 53 निष्पापांचा बळी गेला होता, तर 200 हून अधिक जखमी झाले होते. 

अहमदाबाद येथे साखळी बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर परवेज रंगरेज हा फरारी झाला होता. तो कर्नाकटचा असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाला होती. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. सध्या तो बेळगावात असल्याची खात्रीलायक माहिती पथकाला मिळाली. पथक रविवारी दुपारी बेळगावात दाखल झाले. आधी याची कल्पना स्थानिक अधिकाऱ्यांना दिली. मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश हुगार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहायाने परवेजचा शोध सुरू झाला. पूर्वी भडकल गल्लीत राहणारा परवेज गेल्या काही महिन्यांपासून आझाद गल्ली परिसरात राहात असल्याची माहिती मिळाली. पोलीस तेथेही जाऊन आले. परंतु, तो सापडला नाही. रविवारी रात्री उशिरा तो खडेबाजारमध्ये असल्याचे समजल्यानंतर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. 
 
‘सिमी‘च्या सानिध्यात 
रंगरेज हा पूर्वी दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय असलेल्या स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) संघटनेच्या सानिध्यात होता. गुजरातमधील बॉम्बस्फोटानंतर तो फरारी होता. आठ वर्षांपूर्वी बेळगावात "सिमी‘च्या 15 संशयितांना अटक केली होती. त्यामध्ये परवेज देखील संशयित म्हणून होता. तो रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा चालवतो. त्याने एका हिंदू मराठा समाजातील मुलीशी लग्न केल्याची माहितीही सुत्रांकडून पुढे आली आहे. 

Web Title: suspect in gujarat blast arrested