आमदार पुत्राचा संशयास्पद मृतदेह आढळला 

पीटीआय
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

पाटणा : बिहारचे माजी मंत्री आणि संयुक्त जनता दलाचे आमदार बिमा भारती यांच्या मुलाचा संशयास्पदरीत्या मृतदेह आज सकाळी रेल्वे रुळाजवळ आढळून आला. याप्रकरणी त्याच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. भारती हे पूर्णिया जिल्ह्यातील रूपाउली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. 

दीपक कुमार असे या मुलाचे नाव असून, तो काल रात्री आपल्या काही मित्रांबरोबर बाहेर गेला होता. मात्र, आज सकाळी त्याचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळून आला. यासंर्भात काही स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती कळविली होती, असे पाटणाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनू माहराज यांनी सांगितले. दीपकच्या डोक्‍यावर, मांडीवर आणि शरीरावर जखमेच्या खुणा आढळल्या असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. 

Web Title: A suspected dead body of the MLA Sons was found