विमान अपहरणाच्या संशयाने प्रवाशाचे पंतप्रधानांना 'ट्‌विट'

पीटीआय
शनिवार, 29 एप्रिल 2017

जयपूर: जेट एअरवेजच्या विमानाचे अपहरण झाल्याचा संशय घेत एका प्रवाशाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्‌विट केल्याची घटना काल (गुरुवारी) घडली.

मुंबईहून दिल्लीला जाणारे जेट एअरवेजचे विमान खराब हवामानामुळे जयपूरला वळवण्यात आले. विमान अचानक जयपूरला वळवण्यात आल्याने एक प्रवासी चांगलाच घाबरला. आपल्या विमानाचे अपहरण झाले की काय, अशी शंका त्याच्या मनात आली आणि त्याने थेट पंतप्रधान मोदींकडे मदतीसाठी साकडे घातले.

आम्ही तीन तासांपासून जेट एअरवेजच्या विमानात आहोत. या विमानाचे अपहरण झाल्यासारखे वाटत आहे. आम्ही 9 डब्ल्यू 355 विमानात आहोत. आम्हाला कृपया मदत करा, असे ट्‌विट मुंबईहून जाणाऱ्या नितीन वर्मा नावाच्या एका प्रवाशाने पंतप्रधान मोदींना केले. प्रवाशाने पंतप्रधान मोदींच्या नावाने ट्‌विट करताच विमानतळ सुरक्षा दलांनी लगेच जयपूर विमानतळावर चौकशी केली. विमान जयपूरला उतरताच ट्‌विट करणाऱ्या वर्माला भारतीय दंड संहितेच्या कलम 505 अंतर्गत (लोकांना हानी पोचविणारे निवेदन करणे) अटक करून चौकशीदेखील करण्यात आल्याची माहिती जेट एअरवेजच्या प्रवक्‍त्यांनी दिली. जेट एअरवेजच्या विमानातून 176 प्रवासी प्रवास करत होते. खराब हवामानामुळे जेट एअरवेजचे विमान जयपूरला उतरवण्यात आले होते.

दिल्लीसाठी उड्डाण करण्यापूर्वी विमानाची तपासणी करण्यात आली होती, अशी माहिती जेट एअरवेजचे संचालक एम. पी. बन्सल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. उड्डाण क्षेत्रात विमानांची संख्या वाढल्याने गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी जेट एअरवेजची पाच विमाने आणि ओमानचे एक विमान जयपूर विमानतळावर उतरवण्यात आले होते, असे बन्सल यांनी सांगितले.

Web Title: suspected of hijacking plane; tweet to Prime Minister