सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी गुप्तहेराला अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 22 ऑक्टोबर 2016

सांबा सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालताना भारतीय हद्दीत घुसत असताना या गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. याच्याकडे दोन सिमकार्ड आणि नकाशे सापडले आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी पाकिस्तानी गुप्तहेराला अटक केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांबा सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालताना भारतीय हद्दीत घुसत असताना या गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. याच्याकडे दोन सिमकार्ड आणि नकाशे सापडले आहे. या नकाश्यांवर भारतीय सैन्याच्या तळांचा स्पष्ट उल्लेख दिसत आहे. त्याच्यावर पाकिस्तानी सैन्याला माहिती पुरवत असल्याचा आरोप आहे.

कथुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर शुक्रवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग करत जोरदार गोळीबार केला. त्यास सीमा सुरक्षा दलातर्फे (बीएसएफ) जोरदार प्रत्युत्तर दिले. यात पाकिस्तानचे सात रेंजर्स आणि एक दहशतवादी ठार झाले; तर "बीएसएफ‘चा एक जवान जखमी झाला होता. त्यानंतर या गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे.

Web Title: suspected pakistani spy arrested from jammu and kashmirs samba sector