नुपूर शर्मांच्या अडचणीत वाढ; मुंबई पाठोपाठ कोलकाता पोलिसांची नोटीस

प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे.
Nupur Sharma
Nupur Sharmaesakal

कोलकाता : प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नसून, वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी मुंबई पोलिसांपोठोपाठ (Mumbai Police) आता कोलकाता पोलिसांनीदेखील शर्मांना नोटीस (Notice) पाठवली आहे. तसेच पोलिसांनी शर्मा यांना २० जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पूर्व मेदिनीपूरमध्ये रविवारी एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोलकाता पोलिसांनी नुपूर शर्मा यांना नोटीस पाठवत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (Suspended BJP leader Nupur Sharma Summoned By Kolkata Police)

रजा अकादमीचे पदाधिकारी वकार अ. सगीर अहमद मलिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भिवंडी पोलिसांनी नूपुर शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे; तर तंजीम उलमा अहले सुन्नत या संस्थेचे पदाधिकारी मुफ्ती मुबशीर रजा यांनी ४ जून रोजी दिलेल्या तक्रारीनुसार नवीन जिंदाल यांच्याविरोधातही भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांच्या संदर्भात आपला जबाब नोंदवण्यासाठी व तपासासाठी पोलिसांनी नूपुर शर्मा व नवीन जिंदाल यांना समन्स बजावले आहे. दरम्यान, नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राखावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे.

नुपूर शर्मांनी मागितला वेळ

भाजपच्या (BJP) निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना भिवंडी पोलिसांनी समन्स बजावून सोमवारी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, शर्मा यांनी हजर राहण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला होता. त्यानंतर त्यांना वेळ वाढवून दिला असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 30 मे रोजी रझा अकादमीच्या प्रतिनिधीने दिलेल्या तक्रारीनंतर भिवंडी पोलिसांनी नुपूर शर्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शर्मा यांना नोटीस पाठवून हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याशिवाय भाजपचे माजी पदाधिकारी नवीन कुमार जिंदाल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, जिंदाल यांना 15 जून रोजी जबाब नोंदवण्यासाठी हजर रहा असे आदेश भिवंडी पोलिसांनी दिले आहे. त्यानंतर आता कोलकाता पोलिसांनीदेखील नुपूर शर्मा यांना नोटीस बजावत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शर्मा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com