'नीट'मध्ये अतिरिक्त गुण देण्याच्या निर्णयाला स्थगिती

पीटीआय
शनिवार, 21 जुलै 2018

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आव्हान दिले होते. "आपण अशा पद्धतीने गुण वाटू शकत नाही,' असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने संबंधितांना नोटीस बजावत यातून मार्ग काढण्याबाबत पर्याय सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली : "नीट' परीक्षेवेळी प्रश्‍नपत्रिकेतील चुकीच्या भाषांतरामुळे नुकसान झाल्याचे मान्य करत तमिळ भाषेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 196 अतिरिक्त गुण देण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली. 

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आव्हान दिले होते. "आपण अशा पद्धतीने गुण वाटू शकत नाही,' असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने संबंधितांना नोटीस बजावत यातून मार्ग काढण्याबाबत पर्याय सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तमिळ भाषेतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक फायदा झाल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले.

यंदा झालेल्या "नीट' परीक्षेच्या तमिळ भाषेतील प्रश्‍नपत्रिकेमध्ये 49 प्रश्‍नांमध्ये भाषांतराच्या चुका आढळून आल्या होत्या. या प्रत्येक प्रश्‍नासाठी चार गुण देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. 

Web Title: Suspending the decision to give extra marks in NEET