निर्वासित पालकांवरील कारवाईला स्थगिती

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

मुलांना सोबत घेऊन मेक्‍सिकोमधून अनधिकृतपणे अमेरिकेत प्रवेश केलेल्या निर्वासितांवर करण्यात येणारी कारवाई काही काळासाठी स्थगित करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मुले असलेल्या निर्वासितांना निवारा पुरविण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठीची उपलब्ध व्यवस्था कमी पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे "व्हाइट हाउस'च्या प्रवक्‍त्या सारा सॅंडर्स यांनी स्पष्ट केले. 
 

वॉशिंग्टन - मुलांना सोबत घेऊन मेक्‍सिकोमधून अनधिकृतपणे अमेरिकेत प्रवेश केलेल्या निर्वासितांवर करण्यात येणारी कारवाई काही काळासाठी स्थगित करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मुले असलेल्या निर्वासितांना निवारा पुरविण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठीची उपलब्ध व्यवस्था कमी पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे "व्हाइट हाउस'च्या प्रवक्‍त्या सारा सॅंडर्स यांनी स्पष्ट केले. 

मुले सोबत असलेल्या पालकांवरील कारवाई सध्या स्थगित करण्यात आली असून, लहान मुले सोबत नसलेल्या बेकायदा निर्वासितांवर कारवाई करण्यास प्राधान्य दिले जात आहे, अशी माहिती अमेरिकेच्या सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. मेक्‍सिकोतून बेकायदा अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या निर्वासितांवर कठोर कारवाईचा बडगा अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने उगारला होता. मात्र, अशा प्रकारे कारवाई करतेवेळी पालकांपासून त्यांची मुले वेगळी केली जात असल्यामुळे या धोरणांवर आंतरराष्ट्रीय पातळीवरून जोरदार टीका झाली होती. त्यानंतर निर्वासित पालकांपासून मुलांना वेगळे न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. 

Web Title: Suspension on the action of refugee ban