ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित

Suspension of senior social worker Anna Hazares strike
Suspension of senior social worker Anna Hazares strike

नगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण स्थगित केले आहे. सरकारने सकारात्मक पावले उचलल्याने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकपाल आणि लोकायुक्तबाबत येत्या बैठकीत निर्णय घेऊ तसेच शेतकर्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.

सकारात्मक पावले सरकारने उतलल्याने आंदोलन तात्पुरते स्थगीत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सरकारने अंमलबजावणी नाही केली तर 30 जानेवारी महात्मा गांधी पुण्यतिथी दिवशी पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अण्णा हजारे यांनी मोदी सरकारच्या विरोधात आजपासून (ता.02) म्हणजेच गांधी जयंतीपासून आंदोलनाला सुरवात त्यांच्या जन्मगावातून म्हणजेच राळेगणसिद्धीतून सुरवात केली होती.

दरम्यान, लोकपालबाबत सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याबाबत आपण ठाम असल्याचा निर्धार अण्णांनी केला होता. लोकपालला कमजोर करणारा कायदा कलम 44 अनुसार तीन दिवसांत मंजूर करण्यात आला. तर, साडेचार वर्षांत या कायद्याची अंमलबजाणी होत नाही असा विरोधाभास का? आमची आंदोलनाची देशभर तयारी आहे असेही अण्णांनी स्पष्ट केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com