स्वच्छ सर्वेक्षण अहवालात इंदौरचा 'चौकार'; देशातील चकाचक शहर 

टीम ई-सकाळ
Thursday, 20 August 2020

मध्य प्रदेशातील इंदौरबरोबरच इतर शहरांनीही स्वच्छ सर्वेक्षण अहवालात चांगली कामगिरी केलीय. राज्यातील भोपाळ, रतलाम, देवास, उज्जैन, जबलपूर, सीहोर आणि बरहानपूर या शहरांनाही वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुरस्कार मिळणार आहे.

नवी दिल्ली Swachh Survekshan 2020 : देशातली विशेषतः शहरांमधील स्वच्छतेवरून कायम ओरड होत असते. पण, आपल्या देशातील काही शहर खरचं चकाचक आहेत. देशात 2020मध्ये घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यात मध्य प्रदेशातील इंदौर (Indore) शहर देशातील सर्वांत स्वच्छ शहर असल्याचं जाहीर करण्यात आलंय. पहिल्या तीन शहरांमध्ये गुजरातमधील सूरत (Surat दुसरा क्रमांक) तर महाराष्ट्रातील नवी मुंबई (Navi Mumbai तिसरा क्रमांक) या शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे इंदौर शहराने सलग चौथ्यांदा स्वच्छ शहराचा मान पटकावलाय.

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

मध्य प्रदेशात सर्वांत स्वच्छ शहरं 
मध्य प्रदेशातील इंदौरबरोबरच इतर शहरांनीही स्वच्छ सर्वेक्षण अहवालात चांगली कामगिरी केलीय. राज्यातील भोपाळ, रतलाम, देवास, उज्जैन, जबलपूर, सीहोर आणि बरहानपूर या शहरांनाही वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुरस्कार मिळणार आहे. इंदौरनं 2017, 2018 आणि 2019मध्ये सलग तीन वर्षे स्वच्छ शहराचा मान पटकावला होता. त्यामुळं यंदाही इंदौरच पहिल्या क्रमांकाच्या रेसमध्ये होतं. इंदौरच्या नागरिकांनाही या निकालाची प्रचंड उत्सुकता होती. इंदौरमध्ये अनलॉक-1पर्यंत शहरातली रस्ते चकाचक होत होते. शहरातील प्रमुख रस्ते रात्री धुण्यात येत होते. शहरात रोजच्या रोज कचऱ्याचा उठाव केला जातो. 

आणखी वाचा -  उत्तर भारतात पावसाचा कहर; मुंबईसारखी तुंबली दिल्ली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swachh Survekshan 2020 Indore ranked first for fourth contiguous time