'गो मंत्रालय' स्थापन करा ; स्वामींची मागणी

वृत्तसंस्था
बुधवार, 20 जून 2018

स्वामी अखिलेश्वरानंद गिरी यांनी सांगितले, की राजस्थानात 'गोसेवा संचालनालय' स्थापन होऊ शकते. तसेच मुख्यमंत्री चौहान राज्यात 'हॅप्पीनेस डिपार्टमेंट'ची निर्मिती करु शकतात. तर मग गो मंत्रालय स्थापन केल्यास लोकांना याचा चांगला फायदा होईल.

भोपाळ : मध्यप्रदेशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे गायींसाठी राज्यात स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, अशी मागणी केली. याबाबतची मागणी गोरक्षक संरक्षण बोर्डाचे अध्यक्ष अखिलेश्वरानंद गिरी यांनी केली आहे. गिरी यांनी सांगितले, की ''श्री. चौहान यांनी त्यांच्या घरी गुरांची देखभाल केली. गो मंत्रालय 'सुवर्ण मध्यप्रदेश' बनवू शकेल. त्यामुळे राज्यात गो मंत्रालयाची स्थापना करावी'', अशी मागणी त्यांनी केली.

स्वामी अखिलेश्वरानंद गिरी यांनी सांगितले, की राजस्थानात 'गौसेवा संचालनालय' स्थापन होऊ शकते. तसेच मुख्यमंत्री चौहान राज्यात 'हॅप्पीनेस डिपार्टमेंट'ची निर्मिती करु शकतात. तर मग गो मंत्रालय स्थापन केल्यास लोकांना याचा चांगला फायदा होईल. असे करणे ही त्यांच्या इच्छेनुसार होईल. गोशाळा आणि गायींच्या निवाऱ्यासाठी राज्यात व्यवस्थाही केली. ते म्हणाले, गो मंत्रालयाच्या स्थापनेबाबत आम्ही आशावादी आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swami Given Cabinet Rank Wants Cow Ministry For Golden Madhya Pradesh