...म्हणून स्वामी विवेकानंदानी घेतली समाधी

अशोक गव्हाणे
रविवार, 12 जानेवारी 2020

विवेकानंदानी ४० वर्षापेक्षा जास्त जगणार नाही असे ठरवल्याप्रमाणे, ४ जुलै १९०२ ह्या दिवशी पश्चिम बंगालमधील कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात यजुर्वेदाचा पाठ शिकवला. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली.

स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) : विवेकानंदानी ४० वर्षापेक्षा जास्त जगणार नाही असे ठरवल्याप्रमाणे, ४ जुलै १९०२ ह्या दिवशी पश्चिम बंगालमधील कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात यजुर्वेदाचा पाठ शिकवला. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना समाधी घेत त्यांनी चाळीस वर्षापर्यंत जगणार नाही ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली असे त्यांच्या अनुयायांचे म्हणणे आहे. असे असले तरी, वैज्ञानिक दृष्टिकोन माननारे लोक या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, समाधीच्या संकल्पनेवर विश्वास ठेऊ नये. समाधीच्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवणे निरर्थक असल्याचेही  वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

Image result for swami vivekananda samadhi sthal

फोटो सौजन्य : टाईम्स ग्रुप

मानवाचे अंतिम लक्ष्य ज्ञान हे आहे. संसारामध्ये सहन करावे लागणारे दु:खाचे कारण हेच की आम्ही स्वार्थी होऊन सुखालाच आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष्य ठरवतो आणि त्यासाठी धडपड करीत असतो. माणसाला आयुष्यात ज्या शक्तींना हाताळावे लागते, त्यापैकी मानवी चारित्र्य घडविणारी कर्म ही शक्ती सर्वांपेक्षा मोठी असल्याचा सिद्धांत विवेकानंदानी मांडला.

तत्पूर्वी आज (ता. १२) जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झालेल्या विवेकानंदानी रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले. विवेकानंदांच्या विचारांना माननारे युवक ज्याप्रमाणे आपल्या देशात आहेत, अगदी त्याचप्रमाणे परदेशातही त्यांना माननारे अनेक युवक आहेत. भारतात विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swami Vivekanand Samadhi information in Marathi

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: