भारताव्यतिरिक्त 'या' देशातही आहे विवेकानंदांच्या नावाने रस्ता

अशोक गव्हाणे
रविवार, 12 जानेवारी 2020

स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) : आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले. विवेकानंदानी रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले. विवेकानंदांच्या विचारांना माननारे युवक ज्याप्रमाणे आपल्या देशात आहेत, त्याप्रमाणे परदेशातही त्यांना माननारे अनेक युवक आहेत. भारताप्रमाणे परदेशातही रस्त्यांना आणि चौकाला त्यांचे नाव दिलेले पाहायला मिळते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

म्हणून अमेरिकेतील रस्त्याला विवेकानंदांचे नाव
अमेरिकेतील शिकागो शहरात एका रस्त्याला स्वामी विवेकानंदांचे नाव दिलेले आहे. ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो-आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले होते. तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सात हजार लोकाची मने जिंकली.

Image result for swami vivekananda way chicago

"जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान चालू केले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे त्यांनी या व्याख्यानात सांगितले. त्यांनी फार सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. यानंतर त्यांच्या सन्मानार्थ शिकागो येथिल रस्त्याला स्वामी विवेकानंदा वे (Swami Vivekananda Way) असे नाव देण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swami vivekananda name of Roads in chicago news in marathi

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: