स्वामी विवेकानंद यांना इंग्रजीत होते 46, 47 टक्केच

पीटीआय
सोमवार, 9 जानेवारी 2017

स्वामीजींच्या पांडित्याने आणि इंग्रजीने अमेरिकेतील धर्म संसदेस आणि अमेरिकन नागरिकांना प्रभावित केले होते; मात्र त्यांना मिळालेल्या गुणांनी सर्व जणांची निराशा केली, असे सेनगुप्ता म्हणतात. विवेकानंद यांनी तीन विद्यापीठांच्या दिलेल्या परीक्षांवरून ही गोष्ट स्पष्ट होते.

नवी दिल्ली - स्वामी विवेकानंद यांचे इंग्रजीवर प्रभुत्व असले तरी त्यांना तीन विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये मिळालेले गुण हे फार काही प्रभावशाली नव्हते, असे मत 19 व्या शतकातील तत्त्वज्ञ भिक्षूक या पुस्तकात व्यक्त करण्यात आले आहे.

"आधुनिक भिक्षू : आज आमच्यासाठी स्वामी विवेकानंद' या पुस्तकात लेखक हिंदोल सेनगुप्ता यांनी भारताच्या आधुनिकतेची संकल्पना मांडली आहे. यात सेनगुप्ता म्हणतात, की स्वामी विवेकानंद यांची आधुनिकता आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आपण साधूंची जी कल्पना करतो, त्याच्यापेक्षा वेगळी त्यांची प्रतिमा आहे. स्वामीजींना सर्वत्र सारखे प्रश्‍नच दिसत असतात. त्यामध्ये त्यांनी स्वत:चाही समावेश केला आहे.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म एका श्रीमंत वकील कुटुंबात झाला. कोलकता येथील सर्वांत प्रसिद्ध अशा मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटशन या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेण्यासाठी ते सक्षम होते. त्यांचे इंग्रजी संभाषण आणि लेखन हे ब्रिटिशांसारखेच सक्षम असे होते, असे या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. पेग्विन प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे;

मात्र असे असले तरी त्यांचे इंग्रजीचे गुण काही प्रभावशाली नव्हते, असे लेखकाने त्यात नमूद केले आहे. स्वामीजींच्या पांडित्याने आणि इंग्रजीने अमेरिकेतील धर्म संसदेस आणि अमेरिकन नागरिकांना प्रभावित केले होते; मात्र त्यांना मिळालेल्या गुणांनी सर्व जणांची निराशा केली, असे सेनगुप्ता म्हणतात. विवेकानंद यांनी तीन विद्यापीठांच्या दिलेल्या परीक्षांवरून ही गोष्ट स्पष्ट होते. विद्यापीठाकडून घेतलेल्या प्रवेश परीक्षेत आणि फस्ट आर्ट स्टॅंडर्डमध्ये परीक्षेत इंग्रजीत त्यांना अनुक्रमे 47 आणि 46 टक्केच गुण मिळाले होते, तर बीएला त्यांना 56 टक्के गुण मिळाले होते, असे त्या पुस्तकात स्पष्ट करण्यात आले आहे. स्वामीजींना संस्कृत आणि गणितातही सरासरी एवढे गुण मिळत होते.

विवेकानंद यांचा पत्रव्यवहार आणि भाषणांद्वारा सेनगुप्ता म्हणतात, की त्यांना फ्रेंच कूकबुकवरून त्यांनी खिचडी बनविण्याचा नवा मार्ग शोधला
होता. त्याशिवाय त्यांना अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानामध्ये रुची असल्याचे स्पष्ट होते.

Web Title: Swami Vivekananda Scored 46,47 Per Cent In English Exams