राममंदिरासंदर्भात सुब्रमण्यम स्वामी घेणार आदित्यनाथांची भेट

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 एप्रिल 2017

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिर उभारणी संदर्भात चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. ही अनौपचारिक बैठक असल्याची माहिती स्वामी यांनी दिली आहे.

नवी दिल्ली - अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिर उभारणी संदर्भात चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. ही अनौपचारिक बैठक असल्याची माहिती स्वामी यांनी दिली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना स्वामी म्हणाले, "ही अनौपचारिक भेट आहे. ते मला ओळखतात आणि त्यांचे गुरूही माझ्या चांगल्या परिचयाचे होते. आम्ही दोघेही हिंदुत्वाचे भागीदार आहोत. त्यांनी मला लखनौला भेटायला येण्यास सांगितले आहे. मी नक्‍कीच राममंदिराबाबत चर्चा करणार आहे. मात्र ही बैठक अनौपचारिक आहे.' आदित्यनाथ हे करारी व्यक्तिमत्व असल्याचे सांगत स्वामी जर त्यांनी आश्‍वासन दिले असेल, तर ते नक्कीच पाळतील, असा विश्‍वास स्वामी यांनी यावेळी व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयाने राममंदिर प्रकरण संवेदनशील असल्याने दोन्ही पक्षांनी परस्पर चर्चेने सोडविण्याबाबत सुचविले आहे. न्यायालयाच्या सूचनेचे स्वामी यांनी स्वागत केले आहे. दरम्यान, मागील आठवड्यात राममंदिर प्रकरणाची सुनावणी तातडीने घेण्याबाबत स्वामी यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

Web Title: Swamy to discuss Ram Temple issue with Yogi Adityanath