स्वराज द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना 

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज पाच दिवसांच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. या दौऱ्यामध्ये त्या अनेक बड्या नेत्यांची भेट घेत "ब्रिक्‍स आणि "आयबीएसए'च्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या दोन्ही बैठकांमध्ये भारताची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल.
 

नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज पाच दिवसांच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. या दौऱ्यामध्ये त्या अनेक बड्या नेत्यांची भेट घेत "ब्रिक्‍स आणि "आयबीएसए'च्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या दोन्ही बैठकांमध्ये भारताची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल.

दक्षिण आफ्रिकेत असताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पीटरमारिट्‌झबर्ग रेल्वे स्थानकावर गाडीतून बाहेर फेकण्यात आले होते. या घटनेला 125 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमामध्येदेखील त्या सहभागी होणार आहेत, असे परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. 

Web Title: Swaraj tour on Africa