
Swiggy : प्रमुख पाच शहरांमध्ये स्विगीने ‘ही’ सेवा केली बंद
स्विगी मालकीच्या सुपर डेलीने दिल्ली एनसीआर, मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नईसह पाच शहरांमध्ये कामकाज बंद करण्याची घोषणा केली आहे. सुपर डेलीने मंगळवारी आपल्या वापरकर्त्यांना रोलबॅकबद्दल माहिती दिली. वास्तविक, स्विगी सुपर डेली आपला व्यवसाय कमी करीत आहे. त्यामुळे ते यापुढे अनेक शहरांमध्ये काम करणार नाही. स्विगी सुपर डेली किराणा सामानासह दुधासाठी सबस्क्रिप्शन आधारित वितरण सेवा देते. (Groceries cannot be ordered from tonight)
स्विगीचे सहसंस्थापक आणि सुपर डेलीचे सीईओ फनी किशन अडेपल्ली यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, “आम्ही आमच्या ग्राहकांच्या जीवनाचा एक खास भाग बनलो आहोत. परंतु, आता आम्हाला आमची सेवा बंद करावी लागली आहे. आम्ही अद्याप या सेवा बंद केल्या नाहीत. आम्ही नफ्याच्या मार्गावर नाही. अशा परिस्थितीत व्यवसायात वेळ आणि पैसा खर्च करणे थांबवणे योग्य आहे. आता आपण नवीन आर्थिक वर्षात प्रवेश केला आहे. तेव्हा यापासून आपण स्वतःला वाचवणे महत्त्वाचे आहे.’’
हेही वाचा: टेरर फंडिंग प्रकरण : फुटीरतावादी नेता यासीन मलिकने गुन्हा कबूल केला
सुपर डेलीने ग्राहकांसाठी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही बेंगळुरूमध्ये आमच्या ग्राहकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय सेवा देत राहू. आम्ही १२ मे २०२२ पासून आमच्या सेवा बंद करू. या काळात आम्ही फक्त दुग्धजन्य पदार्थच देऊ. फक्त सबस्क्रिप्शन ऑर्डर दिले जातील. तसेच १० मे २०२२ रोजी रात्रीपासून नवीन ऑर्डर घेतले जाणार नाहीत. जर तुम्ही वॉलेट बॅलन्स आणि सुपर ऍक्सेस मेंबरशिप घेतली असेल तर १२ मे पर्यंत पैसे काढणे सुरू होईल.
कंपनी बद्दल
सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत ग्राहक घरी बसून सुपर डेलीवरून किराणा मालाची ऑर्डर देत असत. कंपनीची स्थापना आयआयटी बॉम्बे पदवीधर श्रेयस नागदवणे आणि पुनीत कुमार यांनी २९१५ मध्ये केली होती. नंतर ई-ग्रोसरी सबस्क्रिप्शन स्पेसमध्ये प्रवेश करण्याच्या हेतूने सप्टेंबर २०१८ मध्ये स्विगीने सर्व-कॅश डीलमध्ये विकत घेतले. सुपर डेलीने ५,००,००० पेक्षा जास्त ग्राहकांपर्यंत आपल्या सेवांचा विस्तार केला आहे. तर सहा शहरांमध्ये दररोज २,००,००० ऑर्डर वितरित केल्या आहेत.
Web Title: Swiggy Closed The Service In Five Major Cities Groceries Cannot Be Ordered From Tonight
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..