"एटी ऍण्ड टी'कडून "टाईम वॉर्नर'ची खरेदी 

वृत्तसंस्था
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली : "एटी ऍण्ड टी' कंपनीने 85.4 अब्ज डॉलरला "टाईम वॉर्नर' कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे टाईम वॉर्नरच्या मनोरंजन व माध्यम व्यवसायाचा ताबा दूरसंचार कंपनी असलेल्या "एटी ऍण्ड टी'कडे येणार आहे. 

हा व्यवहार कर्ज व रोखे अशा स्वरूपात होणार आहे. या व्यवहारातून "टाईम वॉर्नर'ला प्रतिसमभाग 107.50 डॉलर मिळणार आहेत. ही किंमत कंपनीच्या शुक्रवारच्या समभागांच्या बंद होण्याच्या वेळी असलेल्या भावापेक्षा वीस टक्के जास्त आहे. "टाईम वॉर्नर'च्या भागधारकांना या व्यवहारातून प्रतिसमभाग 53.57 डॉलर रोख आणि 53.75 डॉलर समभाग स्वरूपात मिळतील. या व्यवहारामुळे "टाईम वॉर्नर'च्या एचबीओ, सीएनएन आणि वॉर्नर ब्रदर्स यांसारख्या वाहिन्या "एटी ऍण्ड टी'च्या ताब्यात येतील. 

Web Title: at & t buys time warner