धक्कादायक : दिल्लीतील तबलिगी जमातची इमारतच बेकायदा; वाचा सविस्तर बातमी!

tablighi jamaat markaz building illegal delhi nizamuddin
tablighi jamaat markaz building illegal delhi nizamuddin

नवी दिल्ली Coronavirus : राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन भागातील ‘तबलिगी जमात’ या संस्थेच्या मुख्यालयाची इमारतच अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे, दक्षिण दिल्ली नगरपालिका आणि दिल्ली पोलिसांनी आजपासून ‘तबलिगी’च्या मुख्यालयाची झाडाझडती घ्यायला सुरवात केली. या संस्थेची मुख्य इमारत आणि मशीद या दोन्ही वास्तू दोन अनधिकृत भूखंड जोडून त्यावर उभारण्यात आल्याचे उघड झाले आहे. स्थानिक प्रशासनाने दोन मजल्यांची परवानगी दिली असताना त्यावर पाच अनधिकृत मजले बांधण्यात आले.

आठ जणांना पकडले!
या अनधिकृत बांधकामाबद्दलही तबलिगीवर कठोर कारवाई होण्याची चिन्हे आहेत. दिल्ली गुन्हा शाखेचे पथक आज या इमारतीत गेले आणि त्यांनी तपास सुरू केला. दुसरीकडे तबलीगी जमातच्या मलेशियात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आठ लोकांना आज इंदिरा गांधी विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. या सर्वांना मलींडो एअर योजनेच्या विमानात बेकायदेशीरपणे घुसताना यंत्रणांनी रंगेहाथ पकडले होते. या सर्वांवर उपचार छावणीमध्ये उपचार करण्यात येत आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने मुंबई आणि परिसरातील उत्तर प्रदेशच्या गोरगरीब लोकांसाठी मदत केंद्रे सुरू करण्याचे ठरवले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पालघर या भागांत अशी मदत केंद्रे राज्य सरकार सुरू करणार आहे. लखनौतील एका नोडल अधिकाऱ्यावर याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. दुसरीकडे राज्यातील शाळांनी विद्यार्थ्यांकडून लॉकडाउनच्या काळात फी वसूल करू नये, असे निर्देश देतानाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एप्रिलपासून लॉकडाउन शिथिल करण्याबाबत सत्तारूढ आमदार-खासदारांची मते मागवली आहेत. 

तबलिगी सदस्य मुलगा पॉझिटिव्ह 
कोरबा : तबलिगी जमातचा सदस्य असलेला कोरबा जिल्ह्यातील कटघोरा गावातील सोळा वर्षांचा एक मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. तो निजामुद्दीनमधील मेळाव्याला उपस्थित होता का हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या महिन्याच्या सुरवातीला तो इतरांबरोबर महाराष्ट्रातील नागपूरहून गावी परतला होता. चाचणीसाठी घेतलेले त्याचे नमूने रायपूरमधील एम्सकडे पाठविण्यात आले होते. आता त्याला एम्समध्ये हलविण्यात आले आहे. तो पुरानी बस्तीमध्ये १६ जणांसह एका मशिदीत रहात होता. त्या सर्वांना तेथेच क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ते सर्व जण तबलिगीचे सदस्य आहेत, अशी माहिती कोरबाचे आयुक्त किरण कौशल यांनी दिली.

कानपूरमध्ये सहा भाग रेड झोन 
कानपूर : दिल्लीतील तालिबागी जमातच्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर काही अनुयायांनी कानपूरला भेट दिली होती. यामध्ये दोन परकी नागरिकांचा देखील समावेश आहे. आता खबरदारीचा उपाय म्हणून हे अनुयायी जिल्ह्यातील ज्या भागांत गेले होते ते सहा भाग रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या संदर्भात जिल्हा न्यायदंडाधिकारी ब्रह्मदेव राम तिवारी म्हणाले की, चमनगंजमधील हालिम मशीद, कर्नलगंजमधील हुमायून मशीद, बाबूपूर्वा येथील सुफ्फा मशीद, बारीपालभागातील बडी मशीद आदी परिसर रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या भागांतील लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा आधार घेतला असून लोकांनाही या भागापासून दूर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com