Unlock 4: 188 दिवसानंतर ताजमहल पर्यटकांसाठी खुला; पाळावे लागणार सर्व नियम

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 21 September 2020

आग्रा: मार्च 2020 मध्ये ज्यावेळेस देशातल सुरुवातीला कोरोनाचे रुग्ण वाढत होते त्यावेळेस सरकारने देशातील मोठी मंदिरे, पर्यटन स्थळे आणि गर्दी होणारे सर्व ठिकाणं बंद केली होती. पण आता अनलॉक 4 अंतर्गत आजपासून आग्रा किल्ला आणि ताजमहल पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. 

आग्रा: मार्च 2020 मध्ये ज्यावेळेस देशातल सुरुवातीला कोरोनाचे रुग्ण वाढत होते त्यावेळेस सरकारने देशातील मोठी मंदिरे, पर्यटन स्थळे आणि गर्दी होणारे सर्व ठिकाणं बंद केली होती. पण आता अनलॉक 4 अंतर्गत आजपासून आग्रा किल्ला आणि ताजमहल पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. सोमवारी (21 सप्टेंबर) सकाळपासूनच ताजमहल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.

तब्बल 188 दिवसांनंतर पर्यटकांना ताज  पुन्हा एकदा पाहता येणार आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे ताजमहल 17 मार्चपासून पर्यटकांना बंद करण्यात आला होता. त्यानंतर आता 21 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा पर्यटकांसाठी ताजमहल उघडण्यात आलं आहे. पण इथं येणाऱ्या पर्यटकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना पाळाव्या लागणार आहेत.

घ्यावी लागणार ही काळजी-
ताजमहल पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टंसिंगबद्दल विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच प्रत्येकाच्या शरीराचे तापमान तपासल्यानंतरच पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे. ताजमहल पाहायला आलेल्या पर्यटकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्व काळजी घेण्यात आली आहे. नव्या नियमानुसार ताजमहालमध्ये 1 दिवसात फक्त 5000 पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार आहे. या येणाऱ्या पर्यटकांमध्ये सोशल डिस्टंसिंग राहावं यासाठी दोन शिफ्ट देखील करण्यात आल्या आहेत.

 IPL 2020 :मयांक अगरवालच्या प्रयत्नांवर 'टाय' सामन्याने पाणी, दिल्लीचा...

 

दोन शिफ्टमध्ये पर्यटकांना प्रवेश असणार आहे- 

प्रशासनाने दिलेल्या नियमानुसार पहिल्या शिफ्टमध्ये 2500 पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उर्वरित अडीच हजार पर्यटक दुसऱ्या शिफ्टमध्ये ताज पाहण्यास जाता येणार आहे. तसेच ताजमहालच्या परिसरात ग्रुप फोटोग्राफी करण्यास मनाई असणार आहे. ताज परिसरात जाण्यापूर्वी पर्यटकांना सुरक्षा तपासणी करून घ्यावी लागणार आहे. पर्यटकांची सर्व सुरक्षा तपासणी स्पर्श न करता केली जाणार आहे. त्याचबरोबर ताजमहालमध्ये प्रवेश करण्यासाठी पर्यटकांना ऑनलाईन तिकीट बुक करावे लागणार आहे. तिकीट खिडक्या बंद असतील. पार्किंगसह सर्व पैसे डिजिटल पद्धतीने द्यावे लागणार आहेत.

(edited by- pramod sarawale)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taj Mahal open to tourists from today all the rules have to be followed