आसाममध्ये पालकांची जबाबदारी बंधनकारक 

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

गुवाहाटी : आसाम राज्याचा नुकताच अर्थसंकल्प विधानसभेत प्रस्तुत झाला. या अर्थसंकल्पाचे वेगळेपण म्हणजे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पालकांची काळजी घेणे अनिवार्य केले आहे. ही केवळ पोकळ घोषणा नसून एखाद्या कर्मचाऱ्याच्याने याकडे दुर्लक्ष केले तर त्याच्या पगारातील काही भाग हा पालकांसाठी कापून घेतला जाणार आहे. 

आसाम राज्याचे अर्थमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. आपल्या पालकांचा सांभाळ करणे,काळजी घेणे ही प्रत्येका पाल्याची जबाबदारी असल्याचे अर्थमंत्री हिमंता बिस्वा यांनी सभागृहात म्हटले. आसाम राज्य सरकारने 2017-18 वर्षातील 2,349.79 कोटींचा अर्थसंकल्प मांडला आहे. 

भाजप सरकार असलेल्या या राज्यात स्वदेशीच्या प्रचारासाठी आणखी एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे राज्यसरकारनी पाच लाख सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून खादी आणि हॅण्डलूमच्या दोन जोड्या देण्याचे निश्‍चित केले आहे. स्वदेशी वस्तूंच्या वापर प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्वांनी करणे हा उद्देश्‍य यामागे आहे. 
 
Web Title: Take care of your parents, or we’ll do so from your pay: Assam govt to employees