पैसे घ्या; मत मात्र 'आप'ला द्या : केजरीवाल

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

जालंधर : विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी कोणी पैसे देत असले तर घ्या; मात्र, त्यांना मूर्ख बनवून मते फक्त "आप'ला द्या, असा पुनरुच्चार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केला.

पंजाब विधानसभेसाठी 4 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडत असून, यानिमित्त आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. केजरीवाल म्हणाले, " निवडणुकीत उतरलेले सर्व पक्ष तुम्हाला पैशाचे आमिष दाखवतील. ते पैसे स्वीकारा; मात्र, मते "आप'ला द्या. पंजाबमध्ये आपचे सरकार सत्तेत आले तर, येथील औद्योगीकरणाला पुन्हा चालना मिळेल आणि येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.''

शिरोमणी अकाली दल व कॉंग्रेसने राज्याला पूर्णपणे लुटले असल्याची टीकाही केजरीवाल यांनी या वेळी केली. मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्यावर बूट फेकण्याच्या प्रकारामागे "आप'चा हात नसून, सरकारविरोधात नागरिकांमध्ये असलेल्या असंतोषातून हा प्रकार घडला, असे केजरीवाल यांनी स्पष्ट करीत या आपल्यावरील आरोपांचे खंडन केले.

दरम्यान, गोवा येथे केजरीवाल यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करत खळबळ उडवून दिली होती. याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला असून, त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

Web Title: take money but vote for aap, appeals kejriwal