अरदासच्या अवमानप्रकरणी मंत्र्याला सुनावली शिक्षा

पीटीआय
सोमवार, 9 जानेवारी 2017

भटिंडा येथील एका कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री सिकंदरसिंग मालुका यांनी अरदासचा अवमान केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने याच्या चौकशीची मागणी केली.

अमृतसर - शीख समुदायाची प्रार्थना असलेल्या "अरदास'चा अवमान केल्याप्रकरणी अकाल तख्तने एका मंत्र्याला शिक्षा सुनावल्याचा प्रकार समोर आला आहे.

भटिंडा येथील एका कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री सिकंदरसिंग मालुका यांनी अरदासचा अवमान केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने याच्या चौकशीची मागणी केली. यात मालुका दोषी आढळून आल्याने त्यांना अकाल तख्तने सुवर्ण मंदिरात एक तास स्वयंपाकघर व भाविकांची पादत्राणे स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावली. दरम्यान, मालुका यांनी त्यांची चूक मान्य करत प्रायश्‍चित्त घेण्याची तयारी तख्त प्रमुखांसमोर दर्शविली होती.

Web Title: Takht pinishes SAD minister

टॅग्स