समस्या सोडविण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा करा - मेहबुबा मुफ्ती

पीटीआय
Monday, 30 November 2020

‘निवडणुका हे काश्‍मीरमधील समस्यांचे उत्तर नाहीये. यासाठी भारत आणि पाकिस्तानने चर्चा करण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या व माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज केले.

श्रीनगर - ‘निवडणुका हे काश्‍मीरमधील समस्यांचे उत्तर नाहीये. यासाठी भारत आणि पाकिस्तानने चर्चा करण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या व माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज केले.

‘जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीच्या नावाखाली केंद्रातील भाजप सरकार लोकशाहीची हत्या करत आहे. विरोधी उमेदवारांना घरांत डांबून ठेवण्यात येत आहे, तर इतरांना मोकळेपणाने फिरू दिले जात आहे,’ अशी टीकाही मेहबुबा यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘निवडणुका घेतल्याने काश्‍मीरच्या समस्या दूर होणार नाहीत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या चर्चेतूनच मार्ग निघू शकेल. भूमी बळकाविल्याबद्दल जर आपण चीनशी चर्चा करू शकतो, तर पाकिस्तानशी का नाही? पाकिस्तान हा मुस्लीम देश आहे, त्यामुळे जातीयवादी दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिले जाते,’ असे मेहबुबा यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोविशिल्ड लशीचे एका स्वयंसेवकावर दुष्परिणाम? सीरमने केला खुलासा

शनिवारी झालेल्या मतदानाच्या आकडेवारीबद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या, ‘‘या आधीही मतदानाचे प्रमाण मोठे होते. परंतु, हे काश्‍मीर प्रश्‍नाचे उत्तर नाही. सुरक्षा दलाचे सुमारे नऊ लाख जवान येथे तैनात आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने इतर कोणत्या राज्यात जवानांची तैनाती करण्यात आली आहे?

निजाम संस्कृतीतून हैदराबादला मुक्त करू- अमित शहा 

तेच केवळ देशभक्त?
‘भाजप काश्मीर खोऱ्यात स्वत:ची व्यवस्था तयार करू पाहत आहेत. ते मुस्लिमांना पाकिस्तानी संबोधतात. शीखांना खलिस्तानी म्हणतात, सामाजिक कार्यकर्त्यांचा उल्लेख शहरी नक्षलवादी म्हणून करतात, तर विद्यार्थी संघटनांना तुकडे तुकडे गँग म्हणतात, राष्ट्राच्या विरोधातील संबोधतात. प्रत्येक जण दहशतवादी, देशविरोधी आहे तर या देशात हिंदुस्थानी कोण आहे? केवळ भाजपचे कार्यकर्ते?’ असा प्रश्‍न जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी उपस्थित केला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talk to Pakistan to resolve the issue mehbooba mufti