Valentine Day :..अन् हे म्हणताहेत, 'मोदीजी तुम कब आओगे'

वृत्तसंस्था
Friday, 14 February 2020

मोदी, या आणि आमच्याशी बोला

- ...तर आंदोलन मागे घेऊ

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) शाहीन बागेत काहींकडून दोन महिन्यांपासून आंदोलन केले जात आहे. या आंदोलकांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की 'शाहीन बागेत या आणि आमच्यासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करा'.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात 15 डिसेंबरपासून दिल्लीतील शाहीन बागेत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता या आंदोलकांनी 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने पंतप्रधान मोदींना शाहीन बागेत येण्याचे निमंत्रण दिले आहे. तसेच मोदींसाठी खास 'लव्ह साँग' आणि 'सरप्राईज गिफ्ट' तयार असल्याचेही आंदोलकांकडून सांगण्यात आले आहे. 

मोदी, या आणि आमच्याशी बोला

पंतप्रधान मोदींना उद्देशून काही पोस्टर्स शाहीन बागेत पाहायला मिळत आहे. त्यावर लिहिले, की 'मोदीजी, कृपया शाहीन बागेत या. तुमचं गिफ्ट घेऊन जा आणि आमच्याशी बोला'. 

...तर आंदोलन मागे घेऊ

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा किंवा यांच्यासारखे इतर नेतेही आमच्यासोबत चर्चा करू शकतात. सध्या जे काही घडतंय ते संविधानविरोधी नाही, असे त्यांनी पटवून दिल्यास आम्ही आंदोलन मागे घेऊ, असे शाहीन बागेत आंदोलन करणाऱ्या सईद तासीर अहमद यांनी 'पीटीआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talk to Us Shaheen Bagh Protesters Invite PM Modi to Celebrate Valentines Day with Them