गाडी चालवताना मोबाईलवर बोललात तर आता मोबाईल होईल जप्त

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जुलै 2018

रस्ते सुरक्षा हा सध्या सगळीकडेच ऐरणीवरचा विषय झाला आहे. वाहतुकिच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे ही आता वाहनचालकांची सवय झाली आहे. यामुळे, अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. त्यातच गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. गाडी चालवताना फोनवर बोलल्यामुळे झालेल्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे.ही बाब लक्षात घेता उत्तराखंड उच्च न्यायलयाने गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या चालकांचे मोबाईल जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

नैनीताल - रस्ते सुरक्षा हा सध्या सगळीकडेच ऐरणीवरचा विषय झाला आहे. वाहतुकिच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे ही आता वाहनचालकांची सवय झाली आहे. यामुळे, अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. त्यातच गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. गाडी चालवताना फोनवर बोलल्यामुळे झालेल्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे.ही बाब लक्षात घेता उत्तराखंड उच्च न्यायलयाने गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या चालकांचे मोबाईल जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे, असे चालक अढळल्यास 24 तासांसाठी त्यांचा मोबाईल जप्त करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे दंडाची पावती फाडल्यानंतर ही कारवाई करण्यात येणार आहे. न्यायालयाने हे आदेश राज्य परिवहन मंडळाला दिले आहेत. ही कारवाई करण्यासाठी वेगळ्या पथकाची नेमणूक करण्यासही न्यायालयाने सांगितले आहे.

अपघातांचे वाढते प्रमाण बघता न्यायलयाने जून महिन्यात राज्यातील रस्त्यांचे ऑडीट करण्याबाबतही आदेश दिले होते. त्याचप्रमाणे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांना 5 हजारांचा दंड करण्याबाबतचे आदेश राज्य परिवहन मंडळाला दिले होते.

Web Title: Talking while driving in Uttarakhand can make you lose your phone