तमिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या घरावर छापा

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

मुख्य सचिव असलेले राव हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचे निकटवर्तीय आहेत. आज सकाळी हा छापा टाकण्यात आला असून, आणखी काही ठिकाणी छापे टाकण्याची शक्यता आहे.

चेन्नई - तमिळनाडूचे मुख्य सचिव राम मोहन राव यांच्या घरावर आज (बुधवार) सकाळी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.

चेन्नईत नुकतेच प्राप्तीकर विभागाने छापा टाकून 90 कोटी रुपये आणि 100 किलो सोने जप्त केले होते. प्राप्तीकर विभागाने नोटा बदलून देणारे हे रॅकेट उघड केले होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या श्रीनिवास रेड्डी, शेखर रेड्डी आणि प्रेम यांनी दिलेल्या माहितीनंतर आज राव यांच्या अन्नानगर येथील घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात काही हाती लागल्याची माहिती मिळू शकलेली नाही.

मुख्य सचिव असलेले राव हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचे निकटवर्तीय आहेत. आज सकाळी हा छापा टाकण्यात आला असून, आणखी काही ठिकाणी छापे टाकण्याची शक्यता आहे.

Web Title: Tamil Nadu Chief Secretary Rammohan Rao's Chennai Home Raided by Income Tax Officials