प्राप्तिकर अधिकाऱ्यांना धमकी देणाऱ्या 3 मंत्र्यांविरुद्ध तक्रार

वृत्तसंस्था
शनिवार, 15 एप्रिल 2017

चेन्नई (तमिळनाडू) - तमिळनाडूचे आरोग्यमंत्री विजयभास्कर यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान त्यांना अडथळा निर्माण केल्याबद्दल तीन मंत्र्यांविरुद्ध प्राप्तिकर विभागाने तक्रार दाखल केली आहे.

प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी चेन्नईच्या पोलिस आयुक्तांकडे तीन मंत्र्यांविरुद्ध तक्रार केली आहे. त्यामध्ये आर. कामराज, उदुमलई राधाकृष्णन यांच्यासह अन्य एका मंत्र्याचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या आर के नगर येथील जागेसाठीच्या पोटनिवडणुकीदरम्यान मतदारांना पैसे वाटप केल्याचा विजयभास्कर यांच्यावर आरोप आहे. या पार्श्‍वभूमीवर मागील आठवड्यात प्राप्तिकर विभागाने आणि विजयभास्कर यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या मालकीच्या चेन्नई आणि अन्य जिल्ह्यांमधील जागांवर छापे टाकले होते.

आपण निर्दोष असून प्राप्तिकर विभाग आपल्याला त्रास देत असल्याचा दावा विजयभास्कर यांनी केला आहे. तर या छाप्यादरम्यान तीन मंत्र्यांनी अडथळा आणला आणि धमक्‍या दिल्याबद्दल प्राप्तिकर विभागाने तक्रार केली आहे.

Web Title: Tamil Nadu: Complaint filed against ministers for obstructing raids at Vijaya Baskar's residence