धक्कादायक! अल्पवयीन मुलाला जातीवाचक शिवीगाळ करून आगीत ढकललं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime news

धक्कादायक! अल्पवयीन मुलाला जातीवाचक शिवीगाळ करून आगीत ढकललं

चेन्नई : अल्पवयीन मुलाला जातीवाचक शिवीगाळ करून आगीत ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तमिळनाडूतील (Tamil Nadu) विलुपुरम जिल्ह्यातील टिंडीवनम येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: जातीवाचक शिवीगाळीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या; कारवाईची मागणी

पीडित मुलगा विलुपुरम जिल्ह्यातील टिंडीवनम शहरातील कट्टुचीविरी सरकारी शाळेत सहावीत शिकतो. हल्ला करणारे विद्यार्थी देखील याच शाळेत शिकतात. 11 वर्षीय मुलगा सोमवारी दुपारी 4.30 च्या सुमारास आजीला भेटण्यासाठी घरातून निघाला. पण, पाठीवर, छातीवर आणि खांद्यावर भाजलेल्या स्थितीत तो घरी परतला. त्यावेळी त्याच्या पालकांना धक्काच बसला. याप्रकरणी त्याच्याकडे चौकशी केली असता तो घसरून आग लागलेल्या झुडपात पडला, असं त्यानं कुटुंबीयांना सांगितलं.

या मुलाला उपचारासाठी टिंडीवनम शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्याकडे आणखी विचारपूस केली असता, शेवटी त्याने हकीकत सांगितली. त्याच्या शाळेतील काही उच्चवर्णीय विद्यार्थ्यांनी त्याला जातीवाचक शिवीगाळ केली. त्यादिवशी त्याच मुलांनी रस्त्यावर एकटे फिरताना पाहिले त्यावेळी देखील जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर त्याला आग लागलेल्या झुडपात ढकलले. यामुळे मुलाच्या शर्टला लगेच आग लागली. त्याने पाण्याने भरलेल्या टाकीत उडी मारला. त्यामुळे तो स्वतःचा जीव वाचविण्यात यशस्वी झाला. पण, त्याच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत.

मुलाच्या वडिलांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. पीडित मुलाचे म्हणणे ऐकल्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४ आणि एससी/एसटी कायद्याच्या कलम ३ (१) (आर) (एस) अंतर्गत तीन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Tamil Nadu Crime Minor Pushed In Fire After Cast Slur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Tamil Naducrime
go to top