PHOTO : शेतकऱ्याने बांधलंय मोदींचं मंदिर; कशासाठी? फोटो बघाच!

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

तिरूचिरापल्ली जिल्ह्यातील गावात एका शेतकऱ्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधले आहे. 

तिरूचिरापल्ली : एकिकडे मोदी सरकारविरूद्ध देश पेटलेला असताना मात्र तमिळनाडूतील एका गावात वेगळंच चित्र बघायला मिळत आहे. आतापर्यंत कोणत्या नेत्याचं मंदिर बांधलंय असं ऐकायला मिळालं होतं का? नाही ना.. पण तिरूचिरापल्ली जिल्ह्यातील गावात एका शेतकऱ्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 तमिळनाडूतील तिरूचिरापल्लीपासून साधारण 63 किमी अंतरावर असणाऱ्या इरागुडी गावातील पी. शंकर या 50 वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधले आहे. मागील आठवड्यातच हे मंदिर बांधून पूर्ण झाले. या मंदिरात मोदींचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. हुबेहुब मोदींसारख्या दिसणाऱ्या या पुतळ्याला कुंकवाचे गंध लावण्यात आले आहे तर, निळ्या रंगाचे मोदी जॅकेट असलेल्या या पुतळ्याच्या दोन्ही बाजूला समया ठेवल्या आहेत. तसेच वरील बाजूस इतर देवतांचे फोटो लावण्यात आले आहेत. 

Related image

'साधारण आठ महिन्यांपूर्वी या मंदिर बांधणीला सुरवात करण्यात आली. या मंदिराला साधारण 1.2 लाख इतका खर्च आला. मोदीजींच्या कल्याणकारी योजनांमुळे मी प्रभावित झालो. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा मला खूप फायदा झाला आहे. मोदीजींनी सुरू केलेल्या योजनांतर्गत मला 2000 रूपये, गॅस जोडणी व संडास बांधून मिळाले आहे. मी वैयक्तिकदृष्ट्याही त्यांचा खूप आदर करतो,' असे शंकर यांनी सांगितले.

अटलजींचा 25 फूट उंचीचा अष्टधातूंचा पुतळा; एवढा आला एकूण खर्च

Image result for modi temple at tiruchirapalli

'शंकर हे भाजपचे कार्यकर्ते नसून सामान्य शेतकरी आहेत. मंदिराबाबत माहिती मिळताच मी आमच्या लोकांना ते बघण्यास पाठविले व शंकर यांना पक्षात येण्याची विनंती केली', असे भाजपचे प्रादेशिक निरीक्षक ला कन्नान यांनी सांगितले.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tamil Nadu Farmer Builds Temple For PM Narendra Modi