केसांच्या गळतीमुळे आयटी अभियंत्याची आत्महत्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जानेवारी 2018

मदुराई (तमिळनाडू): माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असलेल्या 27 वर्षीय युवकाने केसांची गळती होत असल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर. मिथून राज (रा. जयहिंदपूरम) हा युवक बंगळूर येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत होता. केसांच्या गळतीमुळे त्याला नैराश्य आले होते. विविध ठिकाणी त्याने विविध रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घेतले होते. परंतु, केसांची गळती थांबत नव्हती. यामुळे नैराष्यातून त्याने रविवारी (ता. 31) आत्महत्या केली.

दरम्यान, आर. मिथून राजच्या वडिलांचे 10 वर्षांपुर्वी निधन झाले आहे. आई सोबत तो रहात होता. केसांच्या गळतीमुळे त्रस्त असल्याचे त्याने आई व मित्रांना सांगितले होते. अनेकांनी त्याला सल्लाही दिला होता. तो नैराष्यात गेला होता. रविवारी सकाळी आई मंदिरात गेली होती. यावेळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आई मंदिरातून परत आल्यानंतर त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. शेजारी राहणाऱया नागरिकांच्या मदतीने त्याला खाली उतरून डॉक्टरांकडे नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: tamil nadu news Upset by hair loss techie commits suicide