तमिळनाडूत पावसाचे 16 बळी; कोईमतूरमध्ये भिंत पडल्याने दुर्घटना

पीटीआय
सोमवार, 2 डिसेंबर 2019

तमिळनाडूत अनेक भागांत पाऊस पडत असून कोईमतूरजवळील नादूर गावात भिंत पडून 15 जणांचा मृत्यू झाला. कोईमतूर येथे मुसळधार पावसामुळे शहरातील तीन घरे जमीनदोस्त झाल्याचे सोमवारी सांगण्यात आले.

कोईमतूर-  तमिळनाडूत अनेक भागांत पाऊस पडत असून कोईमतूरजवळील नादूर गावात भिंत पडून 15 जणांचा मृत्यू झाला. कोईमतूर येथे मुसळधार पावसामुळे शहरातील तीन घरे जमीनदोस्त झाल्याचे सोमवारी सांगण्यात आले. चेन्नईत पावसामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

राज्यातील मेट्टुपालयम नादूरमध्ये पावसामुळे 15 फूट उंचीची भिंत कोसळली. भिंतीखाली गाडले गेल्याने दोन लहान मुले, दहा महिलांसह 15 जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी मदत व शोध पथकासह अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई देण्याचा घोषणा तमिळनाडू सरकारने आज केली. चेन्नईतील कोराट्टूरमध्ये अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले. रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. 

Image may contain: one or more people and outdoor

हवामान विभागाने राज्यात मोठ्या पावसाचा इशारा दिला असल्याने अनेक जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालयांना आज सुटी देण्यात आली. मद्रास विद्यापीठ आणि अण्णा विद्यापीठांची आज होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुढील दोन दिवस पाऊस कोळसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

पुद्दुचेरीतील शंकराभरणी नदी काठावरील ग्रामस्थांना पुराचा इशारा काल दिला होता. कुड्डलोर जिल्ह्यातील सखल भागातीस 800 रहिवशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पावसामुळे रोजंदारीवरील मजुरांना कामावर जाणे अशक्‍य झाले होते. अनेक भागात पाणी साचल्याने रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. शेतातही पिकांमध्येही पाणी साचले. 

वाचा ही बातमी - हा महाराष्ट्राला धोका : संजय राऊत 

दोन दिवस पावसाचे 
क्षेत्रीय चक्रीवादळ सूचना केंद्राचे संचालक एन. पुविआरासन यांनी दिलेल्या माहितीनुसार तमिळनाडूत पुढील 24 ते 48 तासांत हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. रामनाथपुरम, तिरुनेलवली, तुतीकोरिन, वेल्लोर, तिरुवल्लूर आदी जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस पडणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळी वारे वाहण्याची शक्‍यता असल्याने लक्षद्विप, केर कोमोरिन या भागात मासेमारसाठी जाऊ नये, असा इशारा पुविआरासन यांनी दिला आहे. 

Image may contain: outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tamil Nadu rain: 16 dead wall collapses