VIDEO : शिक्षकाकडून दलित विद्यार्थ्याला केस ओढून लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण I Government School | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tamil Nadu Government School

सध्या सोशल मीडियावर विद्यार्थ्याला मारहाण करत असलेल्या शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

VIDEO : शिक्षकाकडून दलित विद्यार्थ्याला केस ओढून लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण

सध्या सोशल मीडियावर विद्यार्थ्याला मारहाण करत असलेल्या शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात अत्यंत अमानुष पद्धतीनं एका शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण केली जात असल्याचं दिसत आहे. तामिळनाडूच्या सरकारी शाळेतील हा (Tamil Nadu Government School) व्हिडिओ आहे. वर्गातच इतर विद्यार्थ्यांसमोर एका दलित विद्यार्थ्याला केस ओढून आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील ही घटना आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय, की 56 वर्षांचे शिक्षक सुब्रमण्यम 17 वर्षीय विद्यार्थ्याला केस पकडून मारहाण करत आहेत. व्हिडिओमध्ये शिक्षक त्याला लाथेनं मारताना दिसत आहेत. विद्यार्थी गुडघ्यावर बसला आहे. त्याला छडीने मारहाण केली आहे. कुड्डालोर जिल्ह्यातील चिदंबरम इथल्या सरकारी हायस्कूलमध्ये शिकणारा १७ वर्षीय विद्यार्थी या मारहाणीत जखमी झाला आहे. त्याला जवळच्याच सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून त्याच्या मारहाणीचा व्हिडिओ पोलिसांकडे पुरावा म्हणून दिला आहे. कुड्डालोर पोलीस अधीक्षक एस. शक्ती गणेशन यांनी सांगितलं की, आम्ही अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून शिक्षकांना अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यावर कसला राग काढला? याबाबत विचारले असता विद्यार्थ्यांच्या नेहमीच्या अॅक्टिव्हिटीमध्ये संबंधित विद्यार्थी सहभागी झाला नव्हता. त्यामुळे शिक्षकाचा त्याच्यावर राग होता, असं समोर आलं आहे.

टॅग्स :Tamil Nadu