तमिळनाडूमध्ये अपघातात आठ ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मोटारीला वेगात असतानाच एका गाडीची मागून धडक बसल्याने चालकाचे नियंत्रण गेले आणि ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या माणसांना जाऊन धडकली

कृष्णागिरी - चेन्नई-बंगळूर महामार्गावर आज एका वेगवान मोटारीने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या चार जणांना चिरडले. या धडकेमुळे चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मोटारीला वेगात असतानाच एका गाडीची मागून धडक बसल्याने चालकाचे नियंत्रण गेले आणि ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या माणसांना जाऊन धडकली.

या अपघातात इतर सहा जणही जखमी झाले आहेत. या घटनेनंतर चिडलेल्या जमावाने ती मोटार पेटवून दिली. तिरुपूर येथे घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत व्हॅन आणि खासगी बसची टक्कर होऊन चार जणांचा मृत्यू झाला.

Web Title: tamilnadu accident