अण्णा द्रमुकचे दोन्ही गट पोटनिवडणुकीत आमने - सामने

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

दिनकरन, मधुसूदनन यांना उमेदवारी

चेन्नई: तमिळनाडूतील आर. के. नगर मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीसाठी आज अण्णा द्रमुकचे उपसरचिटणीस टी.टी.व्ही दिनकरन आणि ओ. पनीरसेल्वम यांच्या बंडखोर गटाकडून ज्येष्ठ नेते ई. मधुसूदनन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जयललिता यांच्या निधनामुळे येथे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत असून, त्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.

अण्णा द्रमुकच्या हंगामी सरचिटणीस शशिकला यांचा पुतण्या असलेल्या दिनकरन यांना येथे उमेदवारी दिल्यामुळे शशिकला व पनीरसेल्वम गटासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली आहे.

अण्णा द्रमुकचे "दोन पाने' हे निवडणूक चिन्ह घेण्यास निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना नकार दिला आहे. त्यामुळे दिनकरन हे "टोपी', तर मधुसूदनन हे "विजेचा खांब' या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. 12 एप्रिलला येथे मतदान होणार आहे.

जयललिता यांची भाची दीपादेखील येथून निवडणूक लढवत आहे. तिने "एमजीआर अम्मा दीपा पेरवाई' नावाने संघटना स्थापन केली आहे. द्रमुकतर्फे मरथू गणेश यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे. भाजपतर्फे प्रसिद्ध संगीतकार गंगाई अमरन यांनी आज अर्ज दाखल केला.

Web Title: tamilnadu election