तमिळनाडूसमोर आणखी एका चक्रीवादळाचे संकट उभे

Tamilnadu
Tamilnadu

नवी दिल्ली - तमिळनाडूला निवार या चक्रीवादळाचा फटका बसून आठवडाभराचा कालावधी उलटत नाही तोच राज्यासमोर आणखी एका चक्रीवादळाचे संकट उभे टाकले आहे. खुद्द हवामान खात्यानेच तसा इशारा दिल्याने स्थानिक यंत्रणा सावध झाल्या आहेत. हे नवे वादळ २ डिसेंबर रोजी श्रीलंकेचा किनारा ओलांडेल. या वादळाच्या प्रभावामुळे तमिळनाडू आणि केरळमध्ये जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निवारचा तमिळनाडूला जोराचा तडाखा बसला तरीसुद्धा त्यामुळे कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती. राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून अडीच लाख लोकांना निवारागृहांमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला होता. आता नव्या वादळाची तीव्रता देखील अधिक असण्याची शक्यता आहे.

कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती
पुणे - निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत असताना पुन्हा बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या क्षेत्राची तीव्रता वाढत असून त्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम पुन्हा राज्यातील वातावरणावर होणार असल्याने हवामानात वेगाने बदल होत आहे. 

विदर्भात किंचित थंडी 
राज्यात काही अंशी असलेल्या ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता कमी झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात थंडी गायब झाल्याची स्थिती आहे. परंतु विदर्भातील काही भागात थंडी असल्याने सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे १३.८ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली.

समुद्र खवळणार
या वादळाच्या प्रभावामुळे समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार असल्याने मच्छीमारांना खोल समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. श्रीलंकेचा किनारा, मन्नारचे आखात आणि तमिळनाडू तसेच केरळच्या किनाऱ्यावर मोठ्या लाटा धडकण्याची शक्यता आहे. साधारणपणे दोन नोव्हेंबरपासून या वादळाचा प्रभाव जाणवू लागेल. पुढील चोवीस तासांमध्ये या वादळाचा वेग वाढणार असून त्याच्या प्रभावामुळे समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com