तमक्कुममधील उद्रेकामागे युक्रेनमधील युवक

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

मदूराई - जलिकट्टूवरील बंदीच्या निषेधार्थ तमक्कुम शहराच्या रस्त्यावर उतरलेले शेकडो विद्यार्थी, युवक व व्यावसायिक एकत्र येण्यामागे युक्रेनमधील एका तरुणाचा हात असल्याचे समोर आले आहे.

मदूराई - जलिकट्टूवरील बंदीच्या निषेधार्थ तमक्कुम शहराच्या रस्त्यावर उतरलेले शेकडो विद्यार्थी, युवक व व्यावसायिक एकत्र येण्यामागे युक्रेनमधील एका तरुणाचा हात असल्याचे समोर आले आहे.

तमिळनाडुतील तमक्कुम येथे गेल्या मंगळवारपासून जलिकट्टूच्या समर्थनासाठी रस्त्यावर निदर्शने सुरू होती. सोशल मिडीयावरील मॅसेजमुळे एकत्रित आलेल्या या लोकांमुळे वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली होती. निदर्शकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी जवळपास अर्धा किमी जागा व्यापली होती.
  
या भव्य निदर्शनांसाठी व्हॉट्सअॅपवरुन आवाहन करणारे संदेश युक्रेनमधील एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने पाठवल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मुळचा तमिळनाडुचा असलेल्या या तरुणाने निदर्शकांना इतक्या मोठ्या प्रमाणावर एकत्र आणले.

तमक्कुमचे पोलीस उपायुक्त ए. जी. बाबू यांनी सांगितले, कि या मुलाचा शोध घेऊन त्याला याबाबत विचारल्यानंतर त्याने हे मेसेज सहजच पाठवल्याचे सांगितले.

Web Title: Tamukkam protest triggered by Ukraine guy