ओवेसी म्हणतात, 'दलित आणि मुस्लिमांना लक्ष्य केलं जातंय'

ओवेसी म्हणतात, 'दलित आणि मुस्लिमांना लक्ष्य केलं जातंय'

हैदराबाद : 'जय श्रीराम' आणि 'वंदे मातरम' म्हटले नाही, तर लोकांना मारहाण केली जाते. केवळ दलित आणि मुस्लिमांनाच लक्ष्य केले जात आहे. या घटनांमागे ज्या संघटना आहेत, त्यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे, असा आरोप एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आज केला. 

काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये एका तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेवरून ओवेसी यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला होता. मुस्लिम हे दहशतवादी, राष्ट्रविरोधी किंवा गोहत्या करणारे आहेत, याच मानसिकतेतून त्यांच्याकडे पाहिले जाते. तसे वातावरण भाजप आणि आरएसएसने निर्माण केले आहे, असा आरोप त्यांनी केला होता. आता त्यांनी वंदे मातरम आणि जय श्रीरामच्या घोषणा न म्हणणाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांवरून हल्लाबोल केला आहे. 

जय श्रीराम आणि वंदे मातरम म्हटले नाही, तर मारहाण केली जाते. अशा प्रकारच्या मारहाणीच्या घटना वाढल्या आहेत. मुस्लिम आणि दलितांनाच लक्ष्य केले जात आहे. यामागे असलेल्या संघटनांचा आरएसएसशी संबंध आहे, असे ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com