'राष्ट्रवादी'चे खासदार तारीक अन्वर पक्षातून बाहेर; खासदारकीही सोडली 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली : राफेल करारावरील वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतल्याने नाराज झालेले पक्षाचे खासदार तारीक अन्वर यांनी आज (शुक्रवार) तडकाफडकी राजीनामा दिला. अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचाही राजीनामा दिला आहे. 

तारीक अन्वर हे बिहारमधील कटिहार येथून लोकसभेवर निवडून गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अन्वर पवार यांच्यासोबत होते. 

'राफेल करारामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हेतूंबद्दल काहीही शंका नाही', असे विधान शरद पवार यांनी केले होते. त्यावर अन्वर नाराज झाले होते. 

'राफेल करारामध्ये पंतप्रधान मोदीही सहभागी आहेत. आतापर्यंत मोदी स्वत:ला निर्दोष सिद्ध करू शकलेले नाहीत. फ्रान्सच्या माजी अध्यक्षांच्या विधानावरून या करारामध्ये गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे', असे अन्वर यांनी सांगितले. 'असे असताना माझ्या पक्षाने पंतप्रधान मोदी यांचा बचाव करणे असमर्थनीय आहे. त्यामुळे मी पक्षाचा आणि लोकसभेतील खासदारकीचा राजीनामा देत आहे', असे अन्वर यांनी जाहीर केले.

Web Title: Tariq Anwar resigns from NCP