टाटांची Air India खरेदी करणार Air Asia ची संपूर्ण भागीदारी? | TATA | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Group and Air India

टाटांची Air India खरेदी करणार Air Asia ची संपूर्ण भागीदारी?

नवी दिल्ली : टाटाच्या मालकीच्या एअर इंडियाने (Air India) कमी किमतीत प्रवास सेवा देणाऱ्या एअरएशिया इंडिया (Air Asia India) ताब्यात घेण्याचा प्रस्ताव ठेवला असून, प्रस्तावित करारासाठी CCI कडून मंजुरी मागितली आहे. एका विशिष्‍ट मर्यादेपेक्षा जास्त स्टेक व्‍यवहार करण्‍यासाठी CCI ची मंजुरी आवश्‍यक असते त्यानुसार टाटाकडून CCI कडे मंजुरी मागण्यात आली आहे. एअर एशिया इंडियाने जून 2014 मध्ये उड्डाणास सुरुवात केली असून, कंपनीतर्फे हवाई प्रवासी वाहतूक, एअर कार्गो वाहतूक आणि चार्टर फ्लाइट सेवा प्रदान करते. (Tata Group Air India News)

हेही वाचा: केंद्राला जलसमाधीचा इशारा देणाऱ्या जगद् गुरू परमहंसाचार्यांना ताजमहालबाहेर रोखले

सध्या 80 टक्क्यांहून अधिक भागभांडवल

टाटा सन्स (Tata Sons) प्रा. लि. कडे एअरएशिया इंडियामध्ये 83.67 टक्के हिस्सा आहे आणि उर्वरित एअरएशिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेडकडे (AAIL) आहे, जो मलेशियाच्या AirAsia समूहाचा भाग आहे.

गेल्या वर्षी एअर इंडियाचे अधिग्रहण

टाटा सन्स प्रा. लि. ची (Tata Sons Pvt Ltd) पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या टॅलेस प्राइवेट लिमिटेडने (Tales Pvt Ltd) गेल्या वर्षी Air India आणि तिची उपकंपनी Air India Express चे अधिग्रहण केले होते. आता एअर इंडियाने एअर एशियाची संपूर्ण हिस्सेदारी विकत घेण्यासाठी बाजी लावली आहे.

Web Title: Tata Group Air India Proposes To Acquire Entire Equity Of Airasia India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top