"टाटा'च्या कंपन्यांना 10,700 कोटींचा फटका!

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

मुंबई - टाटा सन्सचे अध्यक्ष सायरन मिस्त्री यांना हटविल्याचे परिणाम दिसत असून टाटा समूहातील कंपन्यांच्या समभागात 3 टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाल्याचे दिसून आले आहे. आज (मंगळवार) या कंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे 10 हजार 700 कोटी रुपयांचे कमी झाले.

मुंबई - टाटा सन्सचे अध्यक्ष सायरन मिस्त्री यांना हटविल्याचे परिणाम दिसत असून टाटा समूहातील कंपन्यांच्या समभागात 3 टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाल्याचे दिसून आले आहे. आज (मंगळवार) या कंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे 10 हजार 700 कोटी रुपयांचे कमी झाले.

आज बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 87 अंशांनी घसरुन 28 हजार 91 अंशांवर बंद झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 17 अंशांनी घसरून 8 हजार 691 अंशांवर बंद झाला. टाटा समूह आणि सायरस मिस्त्री यांच्यातील कायदेशीर लढाईच्या चिंतेने गुंतवणूकदारांमध्ये भीती पसरली आहे. या नव्या "कॉर्पोरेट युद्धा'च्या चिन्हामुळे परकी गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतला. टाटा समूहातील कंपन्यांच्या समभागांवर आज विक्रीचा जोर दिसून आला. सेन्सेक्‍स 87 अंशांनी घसरून 28 हजार 91 अंशांवर बंद झाला. काल निर्देशांकात 101 अंशांची वाढ झाली होती.

टाटा इलॅक्‍सी 1.40, टाटा कम्युनिकेशन्स 2.26, इंडियन हॉटेल्स 3.16, टाटा केमिकल्स 2.09, टायटन 1.19 आणि टाटा मेटालिक्‍स 4.97 टक्के घसरण झाल्याने सेन्सेक्‍सला फटका बसला. टाटा स्टील 2.51, टाटा पॉवर 1.5, टीसीएस समभागात 1.20 आणि टाटा मोटर्सच्या 1.07 टक्के घसरण झाल्याने निफ्टी घसरला. टीसीएसचे बाजार भांडवल 5 हजार 753 कोटी रुपयांनी कमी होऊन 4 लाख 72 हजार 636 कोटी तर टाटा मोटर्सचे बाजार भांडवल 2 हजार 432 कोटी रुपयांनी कमी होऊन 1 लाख 58 हजार 990कोटी रुपयांवर आले. टाटा समूहातील सर्व कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकूण 10 हजार 668 कोटी रुपयांची घसरण झाली.

Web Title: Tata group shares fall; loss of Rs. 10700 crore