esakal | गुदमरणाऱ्या जीवाला टाटा स्टीलचा श्वास; दिवसाला 800 टन ऑक्सिजन पुरवणार

बोलून बातमी शोधा

Tata Steel

आम्ही भारत सरकार आणि राज्यांसोबत एकत्र काम करत आहोत. जेणेकरून मागणीची पूर्तता होईल आणि लोकांचे प्राण वाचू शकतील.

गुदमरणाऱ्या जीवाला टाटा स्टीलचा श्वास; दिवसाला 800 टन ऑक्सिजन पुरवणार
sakal_logo
By
वृत्तसंस्था

Fight with Corona : नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे अनेक राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता टाटा स्टील (Tata Steel)ने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दररोज पुरविण्यात येणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यात वाढ केली आहे. पूर्वी दररोज सहाशे टन वैद्यकीय ऑक्सिजन रुग्णालयांना देण्यात येत होता. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. यापुढे दररोज ८०० टन वैद्यकीय ऑक्सिजन पुरविणार आहे. स्टील मंत्रालयाच्या सूचनेनुसार देशातील विविध स्टील प्रकल्प विविध राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करत आहेत.

हेही वाचा: पंजाब-गुजरातमध्ये कोरोनाचं तांडव; मृत्युदरात शहरे अव्वल

टाटा स्टीलने बुधवारी (ता.२८) यासंबंधीचं एक ट्विट केलं आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा ८०० टन करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारीचं कंपनीने रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा ६०० टन एवढा करणार असल्याचे म्हटले होते. पण यामध्ये २०० टनांनी वाढ करण्यात आली आहे. कोरोनाविरुद्ध संघर्ष सुरू आहे. आम्ही भारत सरकार आणि राज्यांसोबत एकत्र काम करत आहोत. जेणेकरून मागणीची पूर्तता होईल आणि लोकांचे प्राण वाचू शकतील.

हेही वाचा: अमेरिकेचा आपल्या नागरिकांना भारत सोडण्याचा सल्ला; लेवल-४ ट्रॅव्हल अलर्ट जाहीर

टँकरमध्ये केला बदल

स्टील कंपन्यांनी राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा लवकरात लवकर व्हावा यासाठी नायट्रोजन आणि अरगॉनच्या टँकरचे रुपांतर ऑक्सिजन टँकरमध्ये केले आहे. ८ हजार ३४५ मेट्रिक टन क्षमता असणारे ७६५ नायट्रोजन आणि ७ हजार ६४२ मेट्रिक टन क्षमता असलेले ४३४ अरगॉन टँकर वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करतील अशा प्रकारे बदलले गेले आहेत. टँकरमध्ये बदल करण्याची परवानगी पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव सेफ्टी ऑर्गनायजेशनने दिली आहे. राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी १५ हजार ९०० मेट्रिक टन क्षमता असणाऱ्या १ हजार १७२ टँकरमध्ये अशाप्रकारचा बदल करण्यात आला आहे.