टीडीपी ओडिशात उतरणार

पीटीआय
रविवार, 9 डिसेंबर 2018

भुवनेश्‍वर : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम (टीडीपी)ने ओडिशात पुढील वर्षी होणारी विधानसभा आणि लोकसभा निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात बिजू जनता दलाचे सरकार आहे. टीडीपीचे ओडिशा प्रभारी राजेश पुत्र यांनी कोरापूट येथील पत्रकारांशी बोलताना विधानसभेच्या 52, तर लोकसभेच्या पाच जागांवर टीडीपी उमेदवार उभा करणार असल्याचे सांगितले. 

ओडिशाचे टीडीपी प्रभारी यांनी पक्ष दक्षिण राज्यावर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले. ज्या ठिकाणी तेलगू भाषिक अधिक आहेत, त्याकडे पक्षाचे लक्ष राहिल असे त्यांनी नमूद केले. कोरापूट, रायगड, मलकनिगरी, गजपति, गंजम आणि नवरंगपूर येथे टीडीपी उमेदवार उभे करणार आहेत. हे जिल्हे टीडीपीचे गड मानले जातात. तेलगू भाषिक नागरिकांमुळे पक्षाला फायदा होईल, असे चंद्राबाबू नायडूंना वाटते. नायडू लवकरच उमेदवारांची घोषणा करतील, असे म्हटले आहे.

टीडीपीसंदर्भात बोलताना भाजप नेते भृगू बक्षीपात्र म्हणाले, की टीडीपी ओडिशात उतरणार असली तरी स्थानिक राजकारणावर काहीच परिणाम होणार नाही. याअगोदर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील तृणमूल पक्ष ओडिशात उतरणार असल्याचे जाहीर केले होते. सूत्रानुसार शिबू सोरेन यांच्या नेतृत्त्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) देखील राज्यातील उत्तर भागात मयूभंज जिल्ह्यात सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title: TDP will contest in Odisha