राजधानी, दुरांतो गाड्यांत चहा, भोजनाचे दर वाढले

पीटीआय
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

राजधानी, दुरांतो आणि शताब्दी एक्‍स्प्रेस या महत्त्वाच्या गाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या चहा व भोजनाच्या दरांत वाढ करण्याचा निर्णय रेल्वेने केला आहे. एका सरकारी आदेशान्वये ही माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - राजधानी, दुरांतो आणि शताब्दी एक्‍स्प्रेस या महत्त्वाच्या गाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या चहा व भोजनाच्या दरांत वाढ करण्याचा निर्णय रेल्वेने केला आहे. एका सरकारी आदेशान्वये ही माहिती देण्यात आली आहे.

    प्रथमवर्ग वातानुकूलित आणि एक्‍झिक्‍युटिव्ह वर्गासाठी चहा आता ३५ रुपयांना मिळेल. त्याच्या दरात सहा रुपये वाढ करण्यात आली आहे. नाश्‍त्याच्या दरात सात रुपयांनी वाढ करण्यात आली असून, तो आता १४० रुपयांना मिळेल. जेवणाच्या दरांत १५ रुपयांनी वाढ करण्यात आली असून, ते २४५ रुपयांना मिळेल.

    वातानुकूलित द्वितीय वर्ग, वातानुकूलित तृतीय वर्ग आणि चेअरकारमध्ये चहा २०, नाश्‍ता १०५ आणि जेवण १८५ रुपयांना मिळेल. ही वाढ अनुक्रमे पाच, आठ आणि दहा रुपये आहे. 

    प्रवासात प्रादेशिक पदार्थही उपलब्ध होणार असून, ३५० ग्रॅमच्या या ‘स्नॅक मिल’चा दर ‘जीएसटी’सह ५० रुपये असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tea food rate increase in rajdhani and duranto express